Monday, June 3, 2013

पहिला पाऊस, पहिली आठवण



पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिलं घरट, पाहिलं अंगण,
 

पहिली माती, पहिला गंध,
 पहिल्या मनात, पहिला बंध,
 

पहिलं आभाळ, पाहिलं रान,
पहिल्या झोळीत, पहिलच पान,


पहिले तळहात, पहिले प्रेम,
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब,
 

पहिलाच पाऊस, पहिलीच आठवण,
पहिल्या घरट्याच  , पहिलच अंगण..



गीत : सौमित्र
गायक: मिलिंद इंगळे
अल्बम: गारवा 

Wednesday, May 15, 2013

प्रेमाची गोष्ट . . ओल्या सांजवेळी

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी  ये जरा


 कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

 
 आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना


 सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी  जरा सोडून देऊया

 
 माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील  या नव्या वाटेवरी तुझ्या


 रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे 
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत  तुझी साथ दे


वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

 
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे


सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला




गीतकार : अश्विनी शेंडे, गायक : बेला शेंडे - स्वप्नील बांदोडकर, संगीतकार : अविनाश - विश्वजित , गीतसंग्रह/चित्रपट : प्रेमाची गोष्ट (२०१३) / Lyricist : Ashwini Shende, Singer : Bela Shende - Swapnil Bandodkar, Music Director : Avinash - Vishwajeet , Album/Movie : Premachi Goshta (2013)

Thursday, April 25, 2013

सुरेश भट [Suresh Bhat]


"माझिया गीतांत वेडे
दु:ख संतांचे भिनावे ;
वाळल्या वेलीस माझ्या
अमृताचे फूल यावे …!"
 - सुरेश भट