Sunday, December 28, 2008

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

- सुरेश भटांचे काव्य -

मनातल्या मनात मी ..

विडियो:

Lyrics:

मनातल्या मनात मी...
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे

तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले

तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी
'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !
.................................... "
विशेष आभार: http://www.sureshbhat.in/node/657

धुंद होते शब्द सारे.. उत्तरायण

धुंद होते शब्द सारे.. धुंद होत्या भावना..
वार्यासंगे वहाता त्या फुलापाशी थांब ना..

उत्तरायण